स्वतःचे हक्काचे घर ही प्रत्येकाची गरज झाली आहे. मानवी जीवनातील अन्न-वस्त्र-निवारा या तीन मूलभूत गरजांमधील आजकालची ही महत्त्वाची गरज मानली जाते. दिवसभर काबाडकष्ट करून थकूनभागून येणारा माणूस स्वतःच्या घरात येतो, तेव्हा विश्रांतीचे व समाधानाचे क्षण अतुलनीय असतात. उद्याच्या नव्या लढाईला, संघर्षाला सज्ज करण्याचे बळच ती वास्तू देत असते. आर्थिक पाठबळ आता कमी त्रासात उपलब्ध होत असल्याने स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारणे सोपे होऊ लागले आहे...
ऐतिहासिक परंपरा लाभलेले छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) शहर वेगाने विकासाकडे झेपावत आहे. शहराच्या अंतर्गत भागात जुन्या वास्तू व बाहेरच्या भागात शेती असे साधारण 20-25 वर्षांपूर्वीचे चित्र आता बदलले आहे. शहरातही मोठ्या वास्तू उभ्या राहत आहेत व शहराच्या बाहेरच्या बाजूसही नवनव्या वसाहती-गृह प्रकल्प आकाराला येत आहेत. गुंतवणुकीसाठीचे योग्य शहर म्हणूनही छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) कडे पाहिले जाते. चांगले हवामान, मोठ्या शहरांच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तूंच्या कमी असलेल्या किंमती, चांगल्या शाळा, महाविद्यालये, मनोरंजनाची साधने, पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमुळे उपलब्ध रोजगारांच्या विपुल संधी असे आवाक्यातील वास्तव असल्याने मुख्यत्वे मराठवाड्यातील व आसपासच्या जिल्ह्यांतून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) कडे येण्यासाठी लोकांचा ओढा वाढू लागला आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता शहरात स्वतःच्या हक्काचे घर असणे हे केवळ स्वप्नच नव्हे तर प्रत्येकाची गरज बनली आहे.
विकतचे घर घेणे सोपे
काळ बदलला तसा मानवी जीवनातही आमूलाग्र बदल झाला. औद्योगिकीकरण व कृषी विकास जसा होत गेला, तशी आर्थिक समृद्धी येत गेली व स्वतः घर बांधण्यात वेळ घालविण्यापेक्षा तयार घर घेणे जास्त श्रेयस्कर मानले जाऊ लागले. त्यानंतरच गृहप्रकल्पांना चालना मिळाली. जमीन व बांधकाम साहित्यखरेदी, तसेच मजुरांची शोधाशोध, कामावर देखरेख या सगळ्या व्यापापेक्षा तयार घर घेणे काहीसे महाग जात असले तरी अन्य त्रास नसल्याने सोयीचेही होऊ लागले. ग्राहकांची जसजशी गरज वाढू लागली, तसतसा बांधकाम व्यवसायही बदलत गेला. दर्जेदार ब्रँडेड बांधकाम साहित्याचा वापर व अत्याधुनिक सुविधांनी युक्त तयार घरे ग्राहकांना ऑफर केली जात आहेत. आकर्षक जाहिरातींद्वारे घरांत दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती ग्राहकांपर्यत पोचविली जाते. चौकशीसाठी आलेल्या ग्राहकाच्या सर्व शंकांचे निरसन केले जाते, परिणामी तयार घरे आज लोकप्रिय व सहजसोपीही झाली आहेत.
बँकिंग पाठबळाचा फायदा
पूर्वी घर घेताना शासकीय नोकर आपली आयुष्यभराची कमाई घराच्या उभारणीसाठी वापरायचे. त्यावेळी बहुदा निवृत्तीनंतरच स्वतःचे घर होण्याचे स्वप्न आकाराला येत असे. मोठी व्यावसायिक मंडळीही व्यवसायातील चढ-उतारात व्यस्त असल्याने स्वतःचे घर या संकल्पनेला फारसे महत्त्व देत नसायची. छोट्या व्यावसायिकांना तर स्वतःच्या घरासाठीच्या गुंतवणुकीपेक्षा उपलब्ध उत्पन्नातून कोठेतरी भाडोत्री राहणेच बरे पडायचे. पण कुटुंबे विभक्त होऊ लागली, घरातील मुले-मुली शिक्षणानंतर नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी जाऊ लागली, वा कुटुंबातील सदस्य संख्या वाढल्यावर राहते घर अपुरे पडू लागले, त्यानंतर नव्या घराची संकल्पना स्विकारली जाऊ लागली. या संकल्पनेला पाठबळ मिळाले ते बँकांनी पुढाकार घेतल्यावर. कृषी विकास व औद्योगिक विकासाला प्राधान्य देणाऱ्या बँकिंग क्षेत्राने गृहप्रकल्प व वाहनकर्ज सुविधा सुरू केल्यानंतर त्याचा सर्वाधिक फायदा मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीयांना झाला. एकीकडे स्वतःच्या दुचाकी-चारचाकी वाहनाचे स्वप्न साकारताना, दुसरीकडे स्वतःचे हक्काचे घरही आकाराला येऊ लागले. बँकेच्या कर्जाचे हप्ते फेडावे लागत होते, पण उत्पन्नाच्या प्रमाणात हे हप्ते असल्याने त्याची फारशी अडचण जाणवत नव्हती. उलट, तरुण वयात स्वतःचे घर व गाडी घेण्याचे स्वप्न साकारल्याचा आनंद आगळावेगळाच होता. आजही हा आनंद शतपटीने वाढला आहे. अनेक फायनान्स कंपन्या, बँका, मल्टिस्टेट संस्था घरासाठी अर्थपुरवठा करीत आहेत. त्याचा लाभ नोकरदारांसह छोटे-मोठे व्यावसायिकही आवर्जून घेत आहेत.
शेवटी घर म्हणजे चार भिंती, खिडक्या-फर्निचर एवढेच नसते, तर आपल्या जीवनातील सुख-दुःखाची साक्षीदार असलेली ही वास्तू आपला आनंदही व दुःखही पाहते. आपल्या घरात, बंद दाराच्या आत आपल्याकडे काय आहे वा नाही, हा आपला स्वतःचा विषय असतो. पण आपल्या नावाचे घर आहे, तेथे कुटुंबीयांसह राहतो, थकवा दूर करणारे, आनंदक्षण देणारे घर संघर्षाला नवे बळ व उभारी देणारे आहे, हा विचारही मन उल्हासित करणारा असतो.
म्हणुनच आम्ही Auricity च्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मधील सर्वांसाठी त्यांच्या स्वप्नातील व योग्य घर शोधून देण्याची जबाबदारी तर घेतच आहोत पण त्यासोबतच स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे आम्ही सर्वांसाठी अजुन सोपे करत आहोत. Auricity च्या माध्यमातून घर विकत घेणाऱ्या कोणत्याही ग्राहकाकडून आम्ही ब्रोकरेज तर घेणार नाहीच परंतु घेतलेल्या गृहकर्जावर एक रुपयाही व्याज भरण्याची गरज आपणांस पडणार नाही. आपण 20 वर्षांसाठी जे गृहकर्ज घ्याल ते गृहकर्ज फक्त 9 ते 10 वर्षांमध्ये पूर्ण परतफेड करण्याची हमी आम्ही देत आहोत. किंवा घराच्या किंमतीएव्हढाच फंड तुमच्या रिटायरमेंट लाईफसाठी व तेव्हढाच फंड तुमच्या मुलांचे उच्च-शिक्षण, लग्न वा व्यवसायासाठी आम्ही उभा करून देत आहोत. कसे ते जाणून घेण्यासाठी आपण आमच्याशी कधीही संपर्क करू शकता.